Friday, January 21, 2022

नगर:एसटी कर्मचारी काकडे आत्महत्या प्रकरण:परिवहन मंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राज्य परिवहन आगाराचे बस चालक दिलीप काकडे यांनी केलेली आत्महत्या ही दुदैवी घटना आहे. काकडे कुटुंबावर या घटनेने मोठा आघात झाला असून त्यांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. काकडे यांच्या

आत्महत्येप्रकरणी परिवहन मंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली.राज्य परिवहनचे कर्मचारी बसचालक दिलीप काकडे यांनी नुकतीच आत्महत्या केली. दरम्यान मनसेचे दिलीप धोेत्रे व राज्य

प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाणे येथे जावून मयत कर्मचारी काकडे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तत्पुर्वी शेवगाव येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,

शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाठ, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, रस्ते आस्थापना विभागाचे शेवगाव तालुकाध्यक्ष सागर आधाट, गणेश डोमकावळे, ज्ञानेश्वर कुसळकर, उपतालुकाध्यक्ष रामेश्वर बलिया आदी उपस्थित होते.

दिलीप धोत्रे म्हणाले, बसचालक दिलीप काकडे यांनी आत्महत्या केली असून त्यांनी परिवहन कर्मचार्‍यांच्या मागण्यासाठी बलिदान दिले आहे. शासनाने परिवहन कर्मचार्‍यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजे. परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.

एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून आता इंधनदरवाढीमुळे एसटीनेच प्रवास करावा लागत आहे. एसटीचे कर्मचारी हे जोखमीचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. यामुळे एसटीचे कर्मचारी व एसटी वाचली पाहिजे, ही भुमिका मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची आहे. या संदर्भात ते लवकरच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.धोत्रे पुढे म्हणाले की, राज्यातील तिघाडी सरकार व भाजपा हे आपआपसातच सत्तेसाठी भांडत आहेत. यामुळे इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. परिवहन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे.

मात्र तसे न होता अनावश्यक गोष्टीवर कोट्यांवधींचा खर्च केला जात आहे. मात्र परिवहन कर्मचार्‍यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’

योजना आणली. मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांची काळजी घेण्याऐवजी फक्त आबल्याच कुटुंबाची काळजी घेतली. मात्र या कोरोना संकटाच्या काळात मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या मदतीला धावला.मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्ता मिळवण्याअगोदर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट मदतीची मागणी केली होती.

मात्र सत्ता मिळतचा ते सरसकटची मागणी विसरून गेले. ती मागणी मनसेने लावून धरली आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतीपंपाचे वीजबील माफ केले पाहिजे, यासारख्या मागण्या लावून धरल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी दि. 12 नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेनंतर आव्हाणे येथे जावून काकडे कुटुंबातील सुनिता काकडे, मुले- सतिश काकडे, महेश काकडे, मुलगी ज्योती घनवट, भाऊ- शिवाजी काकडे यांचे सांत्वन केले. यावेळी दिलीप धोत्रे व प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते मनसेच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी काकडे यांच्या

वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, परिवहन कर्मचर्‍यांचे प्रश्न सोडवणुकीसाठी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!