Sunday, July 3, 2022

महाराष्ट्रात आज जे नाचे नाचत आहेत त्यांच्या पायामध्ये घुंगरू बांधून….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात तीन लोकसभा आणि २९ विधानसभेच्या जागांवर झालेल्या निवडणुकांचे समोर येत आहेत. यामध्ये शिवसेना ही दादरा नगर हवेली येथे आघाडीवर आहे. या विजयाच्या उंबरठ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा निकाल ऐतिहासिक असणार आहे असे म्हटले आहे.

यासोबत संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे त्याचा शेवट आम्हीच करणार असा इशारा भाजपाला दिला आहे.महाराष्ट्राबाहेर पहिली जागा जिंकण्याचे काम शिवसेना दादरा नगर हवेलीमध्ये करत आहे.महाराष्ट्राच्या बाहेर आणि गुजरातच्या सीमेजवळ

असणारा हा निकाल ऐतिहासिक असणार आहे.तिथूनच देशाच्या राजकारणाचा दरवाजा उघडतो. देगलूरला सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते जिंकणार आहेत,” असे संजय राऊत यांनी टीव्ही ९सोबत बोलताना म्हटले आहे.

“हे निकाल असे सांगत आहे की २०२४ साली केंद्रामध्ये परिवर्तन होणार आहे. त्यावेळी आज जे नाचे नाचत आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पायामध्ये कोणते घुंगरू बांधायाचे आणि त्यांना कसे नाचवायचे हे आम्ही ठरवणार. हे संजय राऊत सांगत आहेत ते लिहून ठेवायचे. आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे .

त्याचा शेवट आम्हीच करणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.भाजपाचे नेते सोशल मीडियावर अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर आहे असे म्हणत असल्याचे पत्रकाराने विचारले. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. “तुमच्या बापाच्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत का?

तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू. पण या पातळीवर आम्ही नाही उतरणार. हे बोंबलणारे भाजपाचे मूळ लोक नाहीत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही उत्तरे देऊ. हे हवसे नवसे गवसे नाचे बाहेरुन आले आहे आणि भाजपाचा

झेंडा फडकवून आम्हाला दाखवत आहेत. भाजपासोबत आमचा संबंध जुना होता आणि आहे. तुम्ही भाजपाविषयी बोलू नका. आम्हाला भाजपा, संघ परिवार काय आहे हे माहिती आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!