Thursday, January 20, 2022

शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून वीज बिल कपातीच्या आदेशाची होळी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : शेतकर्‍यांचा ऊस बिलातून साखर कारखान्यांनी वीज बिल कपात करण्याच्या आदेशाची महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील लालटाकी येथील साखर सहसंचालक यांच्या कार्यालया समोर होळी करण्यात आली. तर विविध मागण्यांसाठी

जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते, अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर, कॉ. भैरवनाथ वाकळे, बापूराव राशीनकर, संजय नांगरे, अशोक नजन, अप्पासाहेब वाबळे, गहिनीनाथ आव्हाड, सुलाबाई आदमाने, भारत आरगडे,

भगवान गायकवाड, सतीश पवार, लक्ष्मण कडू, तुषार सोनवणे, फिरोज शेख, दत्ता वडवणीकर, प्रा.डॉ. गणेश विधाटे आदी सहभागी झाले होते. साखर संचालक कार्यालयाने शेतकर्‍यांचा ऊस बिलातून विज बिल कपात करण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत. हे आदेश अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर व अन्यायकारक

असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर या आदेशाला विरोध दर्शवित सदर आदेश मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले. वीज बिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने पगारी नोकर ठेवले असताना, वीज बिल साखर कारखान्यामार्फत वसूल करण्याचे कोणतेही कारण नाही.

ऊस उत्पादकांच्या संमतीशिवाय कोणतीही कपात करणे बेकायदेशीर आहे. विद्युत महावितरणने शेतकर्‍यांवर मनमानी सुरू केली आहे. थकित वीज बिलापोटी कनेक्शन तोडणे, नवीन कनेक्शन देण्यासाठी खुदाईचा खर्च शेतकर्‍यांकडून घेणे अशी दडपशाही सुरू आहे. मुळात अतिवृष्टीमुळे शेतकरी आपली पीके गमावून बसला आहे.

पावसाळ्यात घरात असलेल्या मोटारीवर वीजबिल आकारणी करून भरमसाठ वीज बिले वाढवली आहेत. हे वीज बिल शासनाने माफ करण्याची आवश्यकता असताना वसुलीची सक्ती केली जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उसाचा गळीत हंगाम सुरू होत आहे. प्रत्यक्षात ऊस दर हा साडेआठ

टक्के रिकव्हरी वर निघण्याऐवजी तो दहा टक्के रिकव्हरी वर जाहीर केला आहे. याचा अर्थ शेतकर्‍यांची जी टक्के रिकव्हरी शासनाने चोरी केली आहे. आज दहा टक्के रिकव्हरीला एकूण दोन हजार नऊशे रुपये एफआरपीला जाहीर झाला आहे. त्यामधून तोडणी वाहतुकीचा खर्च वजा जाता उर्वरित रक्कम शेतकर्‍यांना मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने साडेआठ टक्के रिकव्हरीला दोन हजार नऊशे रुपये एफआरपी द्यावा व ही एफआरपीची रक्कम एक रकमी देण्यात यावी, ज्या कारखान्याने मागील वर्षी एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना अद्याप पैसे दिले नाहीत त्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावे,

प्रामाणिक कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये मदत ताबडतोब द्यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना प्रतिगुंठा दीडशे प्रमाणे एकरी केवळ सहा हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ही शेतकर्‍यांची एकप्रकारे चेष्टा करण्यात आली आहे. 2019 साली नऊशे पन्नास रुपये प्रतिगुंठा मदत देण्यात आली होती.

नुकसान भरपाईची जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असून, याचा पुनर्विचार करुन एकरी चाळीस हजार प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!