Sunday, July 3, 2022

हे आहे फटाक्यांबाबत राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे ? जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळी म्हटलं की मिठाई, रोषणाई आणि आतषबाजी आलीच. पण गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने होणारे प्रदूषण आणि तीन वर्ष असलेला कोरोनाचा धोका पाहता दिवाळीत फटाके

फोडण्यासंदर्भात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

15 सप्टेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली आणि “जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे” असं केजरीवाल म्हणाले होते. नंतर, 28 सप्टेंबर रोजी, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने राष्ट्रीय

राजधानीत 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करत दीपावलीच्या निमित्ताने

फक्त ईको-फ्रेंडली फटाके फोडण्याचं आवाहन केले. काली पूजा आणि दीपावलीच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालणारा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, फटाक्यांवर पूर्ण बंदी असू शकत नाही.

त्याचा गैरवापर रोखण्यासाठी यंत्रणा बळकट केली पाहिजे.दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

करोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा असं आवाहन महाराष्ट्र सरकारने लोकांना केले आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!