Tuesday, January 18, 2022

आता नवेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे;कृषीपंपासाठी वेगळा नियम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाक सुरु आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर नाही अशा अवस्थेत देखील रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरवात झाली आहे.

असे असताना आाता नवेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला असून आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे.

खरीप हंगामात वीजेची आवश्यकता भासत नाही. पावसामुळे पिकांनाही पाणी मिळते मात्र, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवूकीच्या पाण्यावरच यातच सध्या वाढत्या ऊनामुळे पेरणी करण्यापूर्वी आणि पेरल्यानंतरही पाणी द्यावे लागणार आहे.

आतापर्यंत 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी 8 तासच विद्युतपुरवठा राहणार आहे.महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिकचे भरणे कसे होईल याचे नियोजन करावे लागणार आहे.

काळाच्या ओघात सिंचनासाठी आता स्प्रिक्लर, ठिबकचा वापर वाढलेला आहे. मात्र, शेतकरी अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करीत असला तरी विज ही गरजेची आहेच. पण कोळसा टंचाईचे कारण पुढे करीत ही वीज कपात करण्यात आली आहे.

शिवाय 8 तासही सुरळीत पुरवठा होत नसल्याने यंदा महाविरणच्या निर्णयामुळे रब्बीच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणजे झालं

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!