Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील भाजपाचे हे माजी आमदार म्हणतात शरद पवार, अजितदादा या कार्यकर्त्यांना थारा देणार नाहीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नवलेवाडी फाटा येथे आज मध्यरात्री दोन वाजता भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्वस्तधान्य वितरण करणारा ट्रक पकडला. हा ट्रक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याचा

असून या ट्रकमधून धान्याचा काळा बाजार होत असल्याचा भाजप युवा मोर्चाचा आरोप आहे. या संदर्भात भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या प्रसंगी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संबंधित कार्यकर्त्यावर कारवाईची मागणी केली.

या ट्रकमध्ये गहू, तांदूळ, डाळ असे 200 पिशव्या होत्या. हे धान्य पुन्हा सरकारी गोदामात पाठविण्यात आले. तहसीलदार सुरेश थेठे, पोलिस अधिकारी मिथुन घुगे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक व त्यातील धान्याचा पंचनामा करून

ट्रक ताब्यात घेतला. माजी आमदार वैभव पिचड यांनी या धान्याची कसून चौकशी करून कारवाई करावी अन्यथा तहसीलदार कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कचेरीत जाऊन माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

वैभव पिचड म्हणाले, ही एकाच वर्षातील तिसरी घटना असून प्रशासनाने याबाबत अधिक माहिती घेऊन या रॅकेट मध्ये कुणाचे हितसंबंध अडकले आहे त्याची पोलखोल करावी. दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेचे धान्य काळा बाजारात जात असेल तर लोकप्रतिनिधी करतात काय? असा सवाल

उपस्थित करून तहसीलदार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन दिवसांत संबंधितांना अटक करून चालेलला गैरप्रकार थांबवा अन्यथा तहसीलदार कचेरीसामोर धरणे आंदोलन करणार, असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला.

पिचड पुढे म्हणाले, गरिबांचे अन्न चोरायचे आणि वर धमक्या द्यायच्या हे चालणार नाही. प्रशासनाने अमक्याचा फोन तमक्याचा फोन म्हणून सोडून देऊ नये. गरिबांचे अन्न चोरतो त्याला फक्त जेल झाली पाहिजे. गरिबांचे अन्न चोरू नका आणि चोरणाऱ्यांना थारा देऊ नका.

गरीब व्यक्ती सणासुदीला अन्न येईल. गोडधोड खाऊ या आशेवर बसले आहेत. अकोले तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करणारे अधिकारी बदलतात पण ठेकेदार बदलले गेले नाहीत.या पूर्वी तालुक्यात अन्न धान्य चोरी करणारा ट्रक पकडला. त्यावर आमदारांचे पोस्टर होते.

आज पुन्हा दुसऱ्याचा अन्न धान्य चोरणारा ट्रक पकडला त्यावरही आमदारांचे पोस्टर आहेत. ठेकेदार एका पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याला धान्यवितरणाचे अधिकार दिले आहे. वेळ आल्यावर त्याच्या बाबत आणखी उघड करून सांगेल, असेही पिचडांनी सांगितले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!