माय महाराष्ट्र न्यूज:बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी कोरोनाच्या लसीकरणाबद्दल माहिती दिली. तसंच इंदुरीकर महाराज यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.तसंच, राज्यात 7 कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.
3 कोटी लोकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. महाराष्ट्राचे जे टार्गेट आहे त्याच्या 73 टक्के पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झालं आहे. जर केंद्र आणि राज्याच्या आकडेवारीमध्ये फरक असेल तर आपण जुळवणी करण्याचा काम करू, असंही टोपे म्हणाले.
कोविन अॅपवर अतिशय पारदर्शक डेटा असतो त्यावर पूर्ण आकडेवारी आहे पहिल्या दिवशीपासून आपण कधीही आकडे लपवले नाहीत. आमचे आकडे खरे आहेत. त्यामुळे दिशाभूल करण्याच काहीही कारण नाही, असंही टोपे म्हणाले.