माय महाराष्ट्र न्यूज:कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत आनंदाची संधी मिळाली आहे. येत्या काही दिवसात कापसाचा भाव 10 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.कमी उत्पादन आणि वाढती मागणी
या पार्श्वभूमीवर व्यापारी कापूस खरेदीसाठी सोशल मीडियाचाही वापर करत आहेत. असे पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले जात आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर खासगी कापूस व्यापारी 8300 ते 8500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत
कापसाला दर देत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.कापूस क्षेत्रातील निरीक्षकांचे म्हणणे आहे की, हा एक नवीन ट्रेंड आहे जेथे व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. हा चांगला प्रकार
असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे त्यांचे मत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी असली तरी यंदा अपेक्षेप्रमाणे उत्पादन आले नाही. कापूस खरेदीसाठी खासगी कापूस व्यापारी आपापसात स्पर्धा करत आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.
कमी उत्पन्नामुळे खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांना चांगला भाव देत आहेत.महाराष्ट्रासारख्या राज्यात शेतकर्यांना प्रति क्विंटल 9000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कापसाचा एमएसपी 6250 रुपये प्रति क्विंटल आहे. किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे.
पावसामुळे पिकावर परिणाम झाला असून, त्याचाही उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता चांगली किंमत मिळाल्याने त्याची भरपाई होत आहे. दुसरीकडे, दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना आणखी दराची अपेक्षा आहे.