Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यात या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनात दोघांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालूक्यात एका तरूणासह एक वयोवृद्ध इसम पाण्यात बुडून मरण पावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.राहुल सुभाष पवार (वय २६ वर्षे रा. खंडाळा ता. वैजापूर जि. औरंगाबाद) हा तरूण सध्या राहुरी येथे राहत होता.

दिनांक २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान राहुरी येथील चिंचाळे गडधे आखाडा शिवारातील दगड खाणीत राहुल पवार हा अविवाहित तरूण खाणीत असलेल्या पाण्यात बुडून मयत झाला. अथक परिश्रम घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

राहुल पवार याने आत्महत्या केली किंवा त्याचा काही घातपात झाला. हे मात्र समजू शकले नाही. या घटने बाबत चंद्रकांत मोहन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तसेच दुसरी घटना ही राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे घडली आहे. कोळेवाडी शिवारातील मुकूंदा आंबेकर यांच्या शेत तळ्यात आनंद यशवंत आंबेकर या ७५ वर्षीय वयोवृद्ध इसमाचा मृत्यू शेत तळ्यातील पाण्यात बुडून झालाय. या घटने बाबत मुकुंदा आंबेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन्ही घटनेतील मयतांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही घटने बाबत राहुरी पोलीसांत आकस्मात गुन्हयाची नोंद करण्यात आली. या घटनांचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!