माय महाराष्ट्र न्यूज:काल बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 5380 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
काल बाजार समितीत 15 क्विंटल सोयाबीनची आवक झाली.कमीत कमी 5150 रुपये तर जास्तीत जास्त 5380 रुपये तर सरासरी 5265 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले. मकाला 1715 रुपये, गव्हाला 1876 रुपये,
बाजरी 2623 रुपये असा भाव मिळाला. कांदा तसेच डाळिंब लिलाव सोमवारपासून सुरू होणार असल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले.
शेतमाल अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितले आहे की, गेल्या हंगामात स्टॉकिस्टना मोठा लाभ झाला. त्यामुळे यंदाही सोयाबीनचे मार्केट वाढेल या अपेक्षेने खरेदीत उतरले आहेत. त्यातच एफपीसी आणि स्टॉकिस्ट यांची खरेदी वाढल्याने बाजार समितीत आवक कमी दिसत आहे.
तसेच मोठे शेतकरी भविष्यात दर वाढतील या अपेक्षेने माल राखून ठेवत आहेत.गरज असलेले शेतकरी माल विकत आहेत. आयात केलेले सोयापेंड महिना दिड महिन्यात संपेल, तेव्हा सोयाबीनचे दर ५० रूपयांच्या फरकाने कमी जास्त होऊन वाढतील.
त्यामुळे एफएक्यू सोयाबीनचा बाजार ५ ते साडेपाच हजार रूपयांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदम माल न विकता किमानतीन टप्प्यात मार्चपर्यंत माल विकावा. असे आवाहनही राजेंद्र जाधव यांनी केलं आहे.
सरकारने १२ लाख टन जीएम सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर ७ ते साडेसात लाख सोयापेंडीचे करार झाले होते. ही पेंड पुढील महिना ते दीड महिन्यात संपण्याची शक्यता असून त्यानंतर सोयापेडींसाठी स्थानिक बाजारातून मागणी केली जाईल.
त्यामुळे देशातर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या दराला आधार मिळून दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुऴे शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने सोयाबीन विकून तेजी मंदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जाणकारांनी केलं आहे.