Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यातील या तीन साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील तीन साखर कारखाना निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशोक आणि श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी व श्रीगोंदा

साखर कारखान्याच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून, दिवाळीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असून, त्यांनीच तिन्ही साखर

कारखान्यांच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्याचदिवशी आलेल्या हरकती निकाली काढल्या जाणार असून, २६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

अशोक सहकारी साखर कारखाना सूत्रधार माजी आमदार भाानुदास मुरकुटे यांच्या ताब्यात आहे. तर श्रीगोंदा येथील सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना राजेंद्र नागवडे यांच्या ताब्यात आहे. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना

माजी आमदार राहुल जगताप यांच्या ताब्यात आहे. या तिघांच्याही पुन्हा एकदा सत्त्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी राजेंद्र नागवडे विरोधात बंड पुकारत सवता सुभा मांडला आहे.

भानुदास मुरकुटे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी आमदार जयंतराव ससाणे यांच्या निधनानंतर प्रथमच अशोकची निवडणूक होत आहे. ससाणे यांचे चिरंजीव करण हे पॅनल करतात की मुरकुटेशी जुळवून घेतात, याकडे श्रीरामपूरकरांच्या नजरा लागले आहे. तर कुकडीच्या जगतापांना नेहमीच

विरोध करणारे घनशाम शेलार हेही आता राष्ट्रवादीत आहेत. शिवाय शेलार यांना राज्य साखर महासंघाचे संचालकपद मिळावे, यासाठी जगताप यांच्या कुकडीनेच ठराव करून पाठविला होता. त्यामुळे मुरकुटे, जगताप दोघांनाही सत्तेसाठी फारसा संघर्ष करावा लागणार नाही, असे चित्र दिसते आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!