Friday, January 21, 2022

आनंदाची बातमी! कोरोना झाल्यास घेता येणार गोळी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीच्या दिवशी आपल्या देशासाठी चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या गोळीला मान्यता मिळाली आहे. ही मान्यता इंग्लंडमध्ये मिळाली असली तरीही ही चांगलीच बातमी समजली जाते आहे.

हळूहळू ही गोळी जगभरात मिळू शकेल. कोरोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून भारतात सध्या लस देण्यात येते आहे.भारतातील100 कोटींहून अधिक जनतेला पहिला डोस मिळाला आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, स्पुटनिक व्ही या लसी देण्यात येतात.

आता इंग्लंडमध्ये कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या गोळीलाही मान्यता देण्यात आली आहे.अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी

हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल इंग्लंडचे आरोग्यमंत्री साजिद जाविद म्हणाले, ‘आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. इंग्लंड जगातील पहिला देश आहे ज्याने

अशा अँटीव्हायरसला मान्यता दिली आहे जे करोनावर उपचारासाठी घरीच घेतली जाते.’अमेरीका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित या औषधांचा आढावा घेत आहेत. अमेरीकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या महिन्यात सांगितले की ते गोळीची सुरक्षा आणि परिणामकारकता शोधण्यासाठी

नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनेलची बैठक बोलावतील. औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने हे औषध विकसित केले आहे. ऑक्टोबरमध्ये इंग्लंड अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते की त्यांनी या गोळीचे 4,80,000 डोस मिळवले आहेत आणि या हिवाळ्यात आणखी हजारो लोकांवर उपचार करण्यात मदत होण्याची अपेक्षा त्यांना अपेक्षा आहे.

कोरोनावर शोधण्यात आलेली ही गोळी रामबाण ठरू शकतं असंही सचिव साजिद जाविद यांनी म्हटलं आहे. ज्या रूग्णांची रोग प्रतिकारक शक्ती खालावली आहे. तसंच ज्यांना बराच अशक्तपणा आला आहे त्यांच्यासाठी ही गोळी वरदान ठरू शकते असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोव्हिडवरील

पहिल्या गोळीला युकेने मान्यता दिली आहे. कोरोनाची साथ संपण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे असं म्हटलं जातं आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!