Monday, January 17, 2022

विखेंची जळजळीत टीका:नागरिक व शेतकरी अडचणीत पण मंत्री स्वतःला लक्ष्मीकरीता……

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी अडचणीत असताना महाविकास आघाडी सरकारचे मंत्री मात्र स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असून भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले आहे  अशी जळजळीत टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोणी प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्था आणी साखर कारखान्यात सपत्नीक लक्ष्मीपूजन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीये की प्रसन्न आहे? माहीत नाही मात्र हे स्वतःलाच लक्ष्मी करता प्रसन्न करून घेत आहेत. आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत मात्र महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय. शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी आहे.

अशी अवस्था राज्याची झाली  आहे, अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.केंद्र सरकारने आज पेट्रोल डिझलचे दर कमी केले आहे मात्र यावर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली होती. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांचा समाचार घेतला.

महसुलमंत्र्यांचा अभ्यास कमी पडतोय केंद्राने जीएसटी थकवला ही वस्तुस्थिती नसून राज्यातील मंत्र्यांचा केंद्राकडे बोट दाखवण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. आपल्या दिव्याखाली अंधार आहे ना? राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचारातून थोडं बाजूला येवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, असा टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!