Friday, January 21, 2022

या खेळाडूचे अश्लील कृत्य! टीव्ही शोमध्ये ‘तिनं’ केला धक्कादायक खुलासा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला शेन वॉर्न यापूर्वी अनेकदा वादात सापडला होता. कधी मद्यपान करून आणि ड्रग्ज घेऊन, तर कधी मुलींना घाणेरडे मेसेज पाठवल्याचा

आरोप त्याच्यावर होता. आता टीव्ही शोमध्ये सहभागी झालेल्या जेसिका पॉवरने शेन वॉर्नकडून आलेल्या त्या मेसेजबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नला विक्षिप्त उपमा देत जेसिका म्हणाली, ”त्याने मला अश्लील मेसेज पाठवले होते.”

जेसिका पॉवरने सांगितले, ”मी वॉर्नला प्रत्युत्तर दिले. तेव्हा तो’एक्स-रेटेड’ झाला. त्यामुळेच वॉर्न बहुतेक वेळा अडचणीत येतो.” जेसिकाने वॉर्नला वेडा म्हटले. तिने सांगितले, की जेव्हा तिला असे मेसेज आले तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता, की ५२ वर्षीय माजी क्रिकेटपटू

असे कृत्य करू शकतो आणि असे घाणेरडे मेसेज तिला पाठवू शकतो.ती म्हणाली, ”हे आणखी विचित्र होते, की सलग दुसऱ्या आठवड्यात माझ्या इनबॉक्समध्ये शेन वॉर्नचे मेसेज आले होते. तो एक विक्षिप्त आहे. त्याने मला पाठवलेल्या काही गोष्टी योग्य नव्हत्या.

मी त्याला क्वचितच उत्तर दिले. याच कारणांमुळे तो सतत अडचणीत येतो.शेन वॉर्न हा क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. १५ वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत, या दिग्गज लेग-स्पिनने १४५ कसोटी आणि १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये

ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर ७०८ विकेट्स आहेत. वॉर्नने २००७ साली ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!