Thursday, December 7, 2023

आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेपूर्वी 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय  महाराष्ट्र न्यूज:आपण आपले आधार कार्ड अद्यापही व्होटर आयडीसोबत लिंक केलेले नसेल, तर सरकारने आपल्याला मोठा दिलासा दिला आहे. आता सरकारने मतदार ओळखपत्राशी

आधार लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. ही मुदत 1 एप्रिल 2023 वरून 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अथवा एसएमएसद्वारे आधार मतदार ओळखपत्रासोबत लिंक करता येऊ शकते.

मात्र, हे ऐच्छिक असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे. अर्थात हे अनिवार्य नाही.निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आधार मतदान ओळख पत्रास लिंक केल्यास, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघात अथवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा

अधिक वेळा आहे का, हे समजेल. डिसेंबर २०२१ मध्ये लोकसभेने निवडणूक कायदा (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले होते. यात मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करणे अधिकृत करण्यात आले होते.

अशा पद्धतीने मतदान ओळखपत्रासोबत लिंक करा आधार कार्ड –

स्टेप 1 – राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (NVSP) – nvsp.in वर जा.

स्टेप 2 – पोर्टलवर लॉग-इन करा आणि होम पेजवर ‘Search in Electoral Roll’ वर जा.

स्टेप 3 – आपली वैयक्तिक माहिती आणि आधार क्रमांक टाका.

स्टेप 4 – आधार डिटेल टाकल्यानंतर, युजर्सना रजिस्टर्ड मोबाईल अथवा ई-मेलवर एक ओटीपी येईल.

स्टप 5 – आता ओटीपी टाका. असे केल्यानंतर आपला व्होटर आयडी आपल्या आधारला लिंक होईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!