भेंडा(वार्ताहर):— श्रीराम सेवा मंडळ हनुमंतरायाची निष्काम सेवा करत आहे.हनुमंतरायाची सेवा जो जो करतो तो नेहमी आनंदी असतो.या कार्यात तन,मन,धानाने काम केले तर आपल्याला वैभव प्राप्त होते.
जीवनात हनुमानंताची सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्रीसंत नागेबाब मंदिराचे अंकुश महाराज कादे यांनी केले.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीक्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात
हनुमान जयंती निमित्त ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधी रामायनाचार्य नंदकिशोर महाराज नेवासेकर यांचे वाणीतुन आयोजित श्रीराम कथेचे धर्म ध्वजारोहन श्रीसंत नागेबाब मंदिराचे अंकुश महाराज कादे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी उपसभापती तुकाराम मिसाळ,माजी सरपंच गणेश गव्हाणे, ज्ञानेश्वर कारखान्याचे कामगार संचालक जलमित्र सुखदेव फुलारी, माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, उद्योजक बाळासाहेब नवले,अभिजीत पोटे, नागेबाबा देवस्थानचे
अध्यक्ष शिवाजीराव तागड, उद्योजक बापूसाहेब नजन,बाजार समितीचे माजी संचालक संतोष मिसाळ, सुनिल गव्हाणे, राजेंद्र चिंधे, अवधूत लोहकरे, पंडित सराफ, सुनील देशमुख,डॉ. गणेश आरले,देवेंद्र काळे,योगेश लोळगे, कैलास नवले, रामकिसन सानप,शरद गव्हाणे,
शिवाजी फुलारी, किशोर मिसाळ, वाल्मीक लिंगायत, बाबासाहेब गायकवाड,भाऊसाहेब तागड,चांगदेव जगताप,संभाजी मिसाळ,बंडू अंदुरे, अर्जुन शिंदे,संदीप मिसाळ,विश्वास कोकणे,शरद मिसाळ,रमेश पाडळे, राहुल कोळसे,भीमराज शिंदे, संपत फुलमाळी, सराजी मिसाळ, आकाश नजन,
तात्या फुलमाळी,गंगा फुलमाळी,कारभारी फुलारी, रमेश मिसाळ,मुख्याध्यापक संदीप फुलारी, सुधाकर नवथर, रविंद्र डवले, नामदेव गव्हाणे आदी उपस्थित होते.गणेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
वाल्मीक लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले.बापूसाहेब नजन यांनी आभार मानले.