Sunday, June 4, 2023

सहा गावठी कट्टे व बारा जिवंत काडतुसासह एका आरोपिस अटक

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा

तालुक्यातील येथे विक्री करण्याचे उद्देशाने सहा (०६) गावठी कट्टे व बारा (१२) जिवंत काडतुस अवैधरित्या कब्जात बाळगणारा आरोपीला १,५६,०००/- रु. (एक लाख छप्पन हजार) रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने
जेरबंद केले आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

त्यानुसार श्री. कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की, कुकाणा, ता. नेवासा येथील रेकॉर्डवरील एक आरोपी हा गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत काडतुस विक्री विक्री करण्याचे उद्देशाने घोडेगांव-चांदा रोड, सोनई, ता. नेवासा येथे येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि गणेश वारुळे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, पोकों विनोद मासाहकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ संभाजी कोतकर व चालक पोहेकॉ अर्जुन बडे अशांनी मिळून शेतकरी, शेतमजुर असे वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने घोडेगांव- चांदा रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना गळ्यात एक रॉक असलेला बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम दिसला पथकाची खात्री होताच पथक संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला. लागलीच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख (वय ३४ वर्षे) रा. कुकाणा, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये सहा (०६) गावठी बनावटीचे कट्टे व दहा (१०) जिवंत काडतूस मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील इसमाकडे गावठीकट्टे व काडतुसा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन चौकशी करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपीकडे सहा (०६) गावठी कट्टे, दहा (१०) जिवंत काडतूस व एक राखाडी रंगाची सॅक असा एकुण १,५६,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोहेकॉ / ४४० संदीप कचरु पवार, ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. १४३ / २०२३ आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न व आर्म अॅक्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण २ गुन्हे दाखल आहेत ते असे…

भिंगार कॅम्प पोलिस ठाणे:- गु.र.नं.३४ / २०१७ कलम आर्म अॅक्ट ३/२५, ७
नेवासा पोलिस ठाणे:– गु.र.नं. ३८३/२०१८ भादविक कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ सह आर्म अॅक्ट ३/२५

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!