भेंडा/नेवासा
केंद्र सरकारच्या ध्येयधोरणानुसार हाती घेण्यात आलेल्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचे काम वेळेत पूर्ण करून पुढील गळीत हंगामात प्रकल्प कार्यान्वयीत करणार असल्याची माहिती लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 49 व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते शेवटची ऊस मोळी टाकून झाली.
कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,काकासाहेब शिंदे,पंडितराव भोसले,प्रा.नारायण म्हस्के,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के,काशीनाथ नवले,अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ,तुकाराम मिसाळ,जनार्दन कदम,विष्णू जगदाळे, संतोष पावशे,दीपक नन्नवरे,पंचायत समितीचे माजी सदस्य अजित मुरकुटे ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र म्हस्के व सौ.मनीषा म्हस्के या उभयंतांच्या हस्ते गव्हाणीची विधिवत पूजा करण्यात आली.
श्री.घुले पुढे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस-वाहतूक तोडणी मजूर, कारखान्याचे अधिकारी- कामगार या सर्वांच्या सहकार्याने हा 49 वा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडला. कृतज्ञता व्यक्त करणार हा हंगाम सांगता कार्यक्रम आहे. आगामी 50 वा हंगाम सुरू करण्यासाठी करावी लागणारी तयारी आजपासूनच सुरू करायची आहे,त्यासाठी सर्वांनी एक जीनसीपणे काम करावे.
यावेळी उसतोड़नी मुकादम, ठेकेदार,खाते प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.
या हंगाम सांगता कार्यक्रमास मोहनराव गायकवाड, अंबादास कळमकर, दिलीपराव मोटे, रावसाहेब साळुंके,भाऊसाहेब चौधरी,भानुदास कावरे, भीमराज शेंडे, गोरक्षनाथ बर्गे, आबासाहेब ताकटे, दत्तात्रय विधाटे,कचरदास गुंदेचा,गणेश गव्हाणे, काकासाहेब काळे, नामदेव बोरुडे, कुमार नवले,संभाजी पवार, बाळासाहेब नवले,वैभव नवले, बाळासाहेब साळुंके,भाऊसाहेब सावंत,प्राचार्य रामकिसन सासवडे,प्राचार्य भारत वाबळे, कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम. एस. मुरकुटे,महेंद्र पवार,चिफ इंजिनिअर राहुल पाटील,बप्पासाहेब बामदळे,शिवाजी वाबळे आदी उपस्थित होते.दादासाहेब गंडाळ यांनी आभार मानले.
*गळीत हंगाम दृष्टीक्षेप:-*
या वर्षीच्या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्याने हंगाम 149 दिवसात 11 लाख 77 हजार 096 मे.टन ऊसाचे गाळप करून 11 लाख 50 हजार क्विंटल साखर निर्मिती केली.तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून 8 कोटि यूनिट निर्मिती युनिट वीज निर्मिती करून 4 कोटि 77 लाख यूनिट निर्यात वीज निर्यात केली.