Saturday, June 10, 2023

सरपंचपद हे प्रामाणिकपणाने गावाचा विकास करण्यासाठीची संधी-आ.अमोल मिटकरी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज: सरपंच पद हे आपल्या गावाचा प्रामाणिकपणाने विकास करण्यासाठीची संधी आहे.त्या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या गावाचा व परिसराचा कायापालट केला पाहिजे असे मत विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे.

नेवासा तालुक्यात उस्थळ दुमाला येथील सरपंच किशोर सुकाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. व्यासपीठावर सरपंच किशोर सुकाळकर, तुकाराम मिसाळ,कशिनाथ नवले, शिवाजी शिंदे, बबनराव भुसारी, किशोर जोजार,सुरज वाघजे,बिटू लष्करे,अरूण मोरे, गणेश गव्हाणे, अंबादास कळमकर, बी.एस.सोनवणे,सतिष निंपुगे आदी उपस्थित होते.

अमोल मिटकरी पुढे बोलताना म्हणाले की जो माणूस जनतेते असतो तोच ख खऱ्या अर्थाने या पदापर्यंत पोहोचतो.गावाचा विकास करताना शिक्षण,पाणी,रस्ते महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ आपल्या घरात असले पाहिजे.

काही ठिकाणी वाढदिवस साजरा होतात पण ते नको त्या गोष्टींनी होतात.पण किशोर सुकाळकर यांनी व्याख्यान आयोजित करून वाढदिवस साजरा केला हा येणाऱ्या पिढीसाठी आदर्श होत आहे. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होते असे मिटकरी यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब सुकाळकर, कैलास पिटेकर, प्रशांत सुकाळकर, बाबासाहेब सरोदे सर यांनी मेहनत घेतली.

[ काय ते गाव काय ती ती रॅली काय ते सरपंच

आमदार अमोल मिटकरी यांचे गावात आगमन होताच मोठे ढोल ताशे सनई चौघडा फटाके वाजवून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. या स्वागतामध्ये अनेक तरुण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. हे स्वागत पाहून भाषणात अमोल मिटकरी म्हणाले काय ते गाव काय काय ती रॅली काय ते सरपंच असे म्हणाताच गावकऱ्यांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.]

[ पांडुरंग अभंग यांची प्रेरणा घेणार:

या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आमदार अमोल मिटकरी यांचा सत्कार केला यावेळी अभंग यांनी त्यांचे शेतमळा ते विधानसभा हे पुस्तक भेट दिले आणि भाषणात मिटकरी म्हणाले मी पांडुरंग अभंग यांची प्रेरणा घेऊन मी सुद्धा किराणा दुकानदार ते विधान परिषद असे पुस्तक लिहिणार असे मिटकरी यांनी सांगितले.]

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!