भेंडा: मानवी जीवनातील व्यथा दूर करणारी तसेच सर्व दुःखांची वजाबाकी करण्यासाठी रामकथा हे उत्तम साधन आहे असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्या पुष्पात नंदकिशोर महाराज नेवासकर यांनी राम कथेचं महत्व सांगितले.प्रारंभी कथेच्या प्रारंभी पुरोहित गणेश कुलकर्णी देवा यांच्या मंत्रपुष्पांजलींने भेंडा गावच्या सरपंच प्रा.उषा मिसाळ व लहानु मिसाळ यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.
नंदकिशोर महाराज नेवासकर पुढे बोलताना म्हणाले की,येथील श्रीराम सेवा मंडळाचे अतिशय उत्कृष्ट आणि चांगले कार्य चालू आहे. दक्षिणमुखी हनुमानरायांच्या दरबारात आले तर मन अगदी प्रसन्न होऊन गेले. जीवन सफल करण्यासाठी राम कथा श्रवण केली पाहिजे. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते .
पवित्र तुळशीची माळ ज्यांच्याकडे त्यांना कशाचीही भीती नाही .जीवन जगत असताना अपवित्र वागू नये बोलू नये व अपवित्र खाऊ नये. ज्या ठिकाणी श्रीराम कथा सुरू असते तेथे हनुमान जी प्रकट होतात. आपल्या जीवनात संताचे दर्शन होते पण आपल्याला ती ओळखता आले पाहिजे. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी पारायण केले पाहिजे .
गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्व कोणतीही नाही दक्षिण मुखी मारुतीरायांची सेवा केली तर कोणतीही पिडा राहत नाही .यशाची देवता हनुमानजी आहे. सत्कर्म जे करतात त्यांची अवहेलना करू नये असे नंदकिशोर महाराज नेवासकर यांनी सांगितले.
कथेसाठी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, तुकाराम मिसाळ ,डॉ शिवाजी शिंदे ,अशोक मिसाळ सतीश निपुंगे ,बबनराव धस उपस्थित होते. त्याचबरोबर गावातील व आजुबाजूच्या परिसरातील गावातील एकही कथा श्रावणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.