अहमदनगर/प्रतिनिधी
जलसंपदा विभागाचे अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाने ३१ मार्च २०२३ अखेर सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसूली करुन पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला असून
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात वसूलीचे १०९०.६० लाख रुपये उद्दिष्ट असताना ही १२१४.६८ लाख रूपयांची (१११.३८ टक्के) वसूली केल्याची माहिती कार्यकारी अभियंता कु.सायली पाटील यांनी दिली.
अधिक माहिती देताना कु.पाटील यांनी सांगितले की,मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर या विभागाने आतापर्यंतची सर्वात जास्त व विक्रमी सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसूली करुन पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासाठी विभागातील प्रत्येकाने आपापले योगदान दिले आहे. त्यामुळे आम्ही हे उद्दिष्ठ पूर्ण करु शकलो. मागील दोन वर्षांपासून सातत्याने विक्रमी पाणीपट्टी वसूली करीत आहोत. सलग तिसऱ्या वर्षी आपण १०० टक्क्यांपेक्षा जास्त वसूली करुन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्व उपविभागीय अभियंता, अधिकारी, शाखाधिकारी, कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयातील आणि उपविभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार.
तसेच यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सिंचन व बिगर सिंचन संस्था आणि लाभधारकांचे ही मनःपूर्वक आभार भविष्यातदेखील सर्वांकड़ून पुनःश्च अशीच कामगिरी होईल अशी खात्री असलयाचे ही कु. सायली पाटील म्हणाल्या.