Friday, December 3, 2021

करोडपतीची पत्नी १३ वर्षे लहान ड्रायव्हरसोबत पळाली ;शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिक फिरली अन्….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एक ४७ वर्षीय महिला तिच्या प्रियकरासह घरातून ४७ लाख रुपये घेऊन पसार झाली होती. सुमारे महिनाभर प्रियकरासोबत फिरल्यानंतर ही महिला सोमवारी रात्री उशिरा पुन्हा घरी आली.

तसेच पोलीस ठाण्यात जात तिने जबाबही नोंदवला आहे. या महिलेने तिला तिच्या पतीसोबत राहायचे असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या पतीनेही तिला सोबत ठेवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पोलिसांनी ३४ लाख रुपये आधीच

 जप्त केले आहेत. मात्र या महिलेचा प्रियकर असलेला ऑटो ड्रायव्हर अजूनही फरार आहे. खजराना पोलीस ठाण्याचे सीएसपी जयंत राठोड यांनी सांगितले की, १३ ऑक्टोबर रोजी खजराना परिसरातील एका प्रॉपर्टी ब्रोकरची पत्नी १३ वर्षे लहान ऑटो

ड्रायव्हरसोबत पळून गेली होती. जाताना तीन घरातून ४७ लाख रुपये घेऊन गेली. सदर प्रॉपर्टी ब्रोकर कोट्यधीश असल्याचे सांगितले जात आहे.आरोपींनी या पैशांमधील ३४ लाख रुपये मित्रांना दिले गेले होते. ऑटोचालकाचा मित्र रितेश ठाकूर आणि फुरकान

 यांच्याकडून हे पैसे पोलिसांनी आधीच जप्त केले होते. पोलिसांनी महिला आणि ऑटो ड्रायव्हरला ताब्यात घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. मात्र दोघेही पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर सोमवारी रात्री उशिरा सदर महिला स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा ही महिला खजराना पोलीस ठाण्यात पोहोचली जिथे बराच वेळ तिची चौशकी करण्यात आली. महिलेने सांगितले की, ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या स्विफ्ट डिझायर टॅक्सीमधून सदर

महिला प्रियकरासोबत पीथमपूर येथे पोहोचले. त्यानंतर जावरा, शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिक, बडोदा आणि सूरतपर्यंत प्रवास केला. मात्र तोपर्यंत त्यांच्याकडील पैसे संपत आले होते. त्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर सदर महिला परत घरी आली.

पोलिसांनी या घटनेच्या काही दिवसांनंतर टॅक्सी ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीमध्ये ते पीथमपूरमध्ये गेल्याचे समजले. तेथून बसमधून जावरा येथे पोहोचले. तिथून ते फिरत फिरत परत इंदूर येथे आले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!