Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकिंग:भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विहीरीत पडून मृत्यु

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विहीरीत मृत्यु झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे बुधवारी (दि .१०) सकाळी ९ वा. घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

विहीरीत पडून मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव शुभांगी कैलास बाबर ( वय ३१,रा.कानडी बेलगाव ता. कर्जत) असून ती आपल्या दोन चिमुरडया मुलांसह भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी गोवर्धन पिराजी बोठे ( रा. वाळकी ) यांच्या घरी आली होती.

बुधवारदि .१० रोजी सकाळी ९ च्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत ती पडल्याची घटना घडली. घरच्यांचे लक्ष जाताच तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला . मात्र विहीर जुनी असल्याने झाडाझुडपामुळे तिला वाचविण्यात अपयश आले.

नगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने विहिरीतील विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेची माहीती कळताच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, मा.जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ,

सरपंच शरद बोठे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील सुत्र हलविली. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भेट देऊन पाहणी केली .

दरम्यान मयत महिलेस दोन लहान मुले असून , पती लष्करी सेवेत आसाम येथे कार्यरत आहे.भाऊबीजेसाठी आलेल्या विवाहितेचा विहीरीत पडून मृत्यु झाल्याने वाळकी व बेलगावात शोककळा पसरली.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!