Saturday, November 27, 2021

मोठी बातमी :नगरमधील खासगी रुग्णालये गुरुवारी बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवावी आणि आगीच्या घटनेत जिल्हा

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहमदनगर शाखेने गुरुवारी बंद पुकारला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन राज्यस्तरावर निषेध नोंदवण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती अहमदनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी यावेळी दिली.

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्याविरोधात मंगळवारी अटकेची कारवाई झाली. त्याचे पडसाद जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य क्षेत्रात उमटले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आग प्रतिबंधक यंत्रणा

तातडीने बसवण्याच्या व इतर मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेनं बुधवारी काम बंद आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला पाठिंबा देत डॉ. आठरे यांनी ही घोषणा केली.

दरम्यान, खासगी रुग्णालये बंद ठेवण्याची घोषणा करताना असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. पारस कोठारी, डॉ. जयदीप देशमुख आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!