नेवासा
तालुक्यातील धामोरी (देवगड) या गावी राहणारे देवगड भक्त मंडळ परिवारातील धामोरी भजनी मंडळाचे अध्यक्ष यादव विठ्ठल पटारे (वय 48 वर्षे) यांनी आपली स्वतःची किडनी दान करून जावयाचे प्राण वाचविले.
यादव पटारे यांचे जावई आनंद सोमनाथ जोगदंड (वय 30 वर्षे) रा. बालाजीनगर,औरंगाबाद यांच्या वर्षांपूर्वी दोनही किडन्या खराब झाल्यामुळे त्यांच्यावर किडनी पत्यारोपण शस्त्रक्रिया मागील आठवड्यात औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पार पडली.
डॉ.सुधीर कुलकर्णी, डॉ.क्षितिजा गाडेकर, डॉ.अभय महाजन, डॉ.अंकित दाता, डॉ.राहुल टेंगसे यांनी सर्वांनी मिळून ही शस्त्रक्रिया वेगवेगळे रक्तगट असूनही यशस्वीरित्या पार पडली.
या उपक्रमाचे परिसरातून व तालुक्यातून कौतुक होत आहे. महंत सुनीलगिरी महाराज यांनी यादव पटारे यांची भेट घेऊन त्यांच्या कौतुकास्पद निर्णयाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला. एमजीएम हॉस्पिटल च्या सर्व स्टॉप चा दोन्हीही कुटुंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
*किडनी दान करण्याचे आवाहन…*
माझ्यासारख्या अनेक गरजूंना किडनीची गरज असते. आपणही त्यांना किडनी दान करू शकता. कुठलाही त्रास नाही.आपल्यामुळे एखाद्याचे प्राण वाचलेचा आनंद आयुष्यभर विसरला जात नाही.
– आनंद जोगदंड,लाभार्थी