Saturday, November 27, 2021

पेट्रोल व डिझेलच्या दरात दिलासा, जाणून घ्या आजची किंमत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दिलासा कायम आहे. गुरुवारीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नाही. केंद्र सरकारने दिवाळीनिमित्त जनतेला मोठी भेट देत पेट्रोल आणि डिझेलवरील

उत्पादन शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळी तेल कंपन्यांनी दरात वाढ न केल्याने हा दिलासा कायम होता. राजधानी दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तेल कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आज सकाळी जाहीर झालेल्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर डिझेल 94.14 रुपये प्रतिलिटर झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशा ठरवल्या जातात?आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज फक्त एका

 एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवायचे आहे. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी https://iocl.com/petrol-diesel-price येथे क्लिक करा

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!