Saturday, November 27, 2021

मोठी घडामोड:भाजप नेत्या पंकजा मुंडेंची शिवाजी कर्डिलेंच्या निवासस्थानी भेट ; राजकीय चर्चेला उधाण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे आज नगर दौर्‍यावर असून सकाळी त्यांनी बुर्‍हाणनगरला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कर्डिले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खा.डॉ.सुजय विखे, आ.मोनिका राजळे,

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगरसेवक मनोज कोतकर,दिलीप भालसिंग, अनिल करांडे,राम पानमळकर आदी उपस्थित होते. माजी मंत्री कर्डिले यांनी सध्या विधानपरिषद निवडणुकीची तयारी चालवली आहे. त्यांनी दिवाळीनिमित्त

या मतदारसंघातील खास मतदारांच्या भेटीगाठीही चालवल्या आहेत. यापार्श्वभूमीवर भाजप नेत्या मुंडे यांची कर्डिलेंच्या निवासस्थानी दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.दरम्यान विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील काही नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले

वगळता उघडउघड अद्याप कोणी वाच्यता केली नाही. कर्डिले यांनी मात्र दिवाळीचा मुहूर्त साधत जिल्ह्यातील विधान परिषदेचे मतदार, मान्यवरांपर्यंत मिठाई पोचविली आहे. त्यानिमित्ताने अप्रत्यक्षरीत्या मतदारांचे मत अजमाविण्यात आल्याचे सांगितले जाते.

भाजपकडे विधान परिषदेसाठी कर्डिले वगळता अद्याप तरी दुसऱ्या कोणत्याही तगड्या उमेदवाराचे नाव चर्चेत नाही. भाजपकडूनच कर्डिले यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता असली,

तरी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेवरच गणिते अवलंबून आहेत.मागील एका कार्यक्रमात खासदार विखे यांनी कर्डिले पुन्हा आमदार होणार, असे म्हटले होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!