Tuesday, November 30, 2021

भागडा चारी योजनेच्या वीज बिलासाठी ४७ लक्ष निधी मंजूर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राहुरी तालुक्यातील भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे थकीत विद्युत देय्यक भरण्यासाटी जलसंपदा विभागाने ४७ लक्ष २२ रु चा निधी वितरीत केला असल्याची माहिती नगरविकास, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

पश्चिम भागात कणगर, चिंचविहिरे, वडनेर, गणेगाव, तांभेरे, गुहा या गावांसाठी वरदान ठरणा-या भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे विज बिल थकीत होते. यासंदर्भात येथील लाभधारक शेतक-यांनी वेळोवेळी

राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मागणी करुन विज बिल भरण्याकामी निधी मिळावा यासाठी आग्रही मागणी केली होती. यावर राज्यमंत्री तनपुरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करुन सदर योजनेच्या थकीत विज देय्यकासाठी निधीची मागणी केली होती.

त्यावर मंत्री पाटील यांनी शासन पातळीवर त्वरीत निर्णय घेवुन ४७ लक्ष २२ हजारांचा निधी भागडा चारीसाठी विद्युत देयक रक्कम भरणेकामी प्राप्त झाला असल्याचे सांगितले.महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या निर्णयान्वे उपसा जलसिंचन योजनेच्या वीज

देयकांमधील ८१ टक्के वाटा महामंडळास प्राप्त होणा-या बिगर सिंचन पाणीपट्टीतुन भागविण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार उपसा जलसिंचन योजनांच्या वीज देयकांबाबत निधी मागणी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करतांना

८१ टक्के रक्कमेप्रमाणे निधी मागणी करण्यात यावी असे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले. हा निधी प्राप्त झाल्याने भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष सुयोग नालकर, उपाध्यक्ष विजय नरोडे, सचिव किरण गव्हाणे व परीसरातील लाभ धारक शेतक-यांनी राज्यमंत्री तनपुरे व मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!