Saturday, November 27, 2021

नगर: आग लागली तेव्हा ICU मधील कर्मचारी चहा-नाश्ता करत होते ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये काम करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अतिदुर्लक्षामुळे ६ नोव्हेंबर रोजी ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या आगीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

तेव्हा त्यात असं आढळून आलं की आग लागली तेव्हा आयसीयूमधले कर्मचारी चहा-नाश्ता करण्यासाठी गेलेले होते.
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील मनोज पाटील यांनी सांगितलं की, आग लागली तेव्हा आयसीयूमध्ये रुग्णालयाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.

ते जवळच्या कॅन्टीनमध्ये चहा-नाश्ता करण्यासाठी गेले होते. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदत केली असती तर अनेकांचे जीव वाचवता आले असते. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चालू

असून पुरावे सापडल्यास आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. याविषयी इंडिया टुडेने सविस्तर वृत्त दिलं आहे.या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी

डॉ. सुरेश ढाकणे व सुरेखा शिंदे आणि परिचारिका डॉ. सपना पठारे यांना सोमवारी निलंबित केले. तर परिचारिका अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना बडतर्फ करीत त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या. जिल्हा सरकारी रुग्णालयास शनिवारी सकाळी

लागलेल्या भीषण आगीत ११ करोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!