Friday, December 3, 2021

संजय राऊत पिसाळलेलं पात्र, त्यांच्या मेंदूत 21 इंजेक्शन मारण्याची गरज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते गोपीचंद पडकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत बोलताना भडक प्रतिक्रिया दिली आहे. मागील दोन वर्षापासून संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे.

पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शनची गरज असते, त्यामुळे संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज आहे, तरचं हे ठिकाणवर येतील, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

दीड दमडीच्या पगारावर आपण किती बोलावं? महाराष्ट्राला किती उपदेश करावेत? संजय राऊत देत असलेले उपदेश महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे. शिवसेनेनं

एक बैठक घेऊन यांना रेबीज इंजेक्शनची एक लस द्यावी, असेही पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकारांच्या यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत कसं प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांची हीच ड्युटी आहे, त्यांना याच कामासाठी ठेवलेला आहे.

हे कोणत्या आंदोलन कधी गेले ? पगार पुरतं संजय राऊतांना बोलावं लागतं, असा घणाघात पडळकर यांनी केलाय.
एसटी आंदोलनावरही पडळकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे त्यावेळी अर्थमंत्री होते परिवहन

विभागाकडून जर एखादा प्रस्ताव आला असता तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करू शकलो असतो. पण तसा प्रस्ताव आला नव्हता.

संजय राऊत काय म्हणाले होते?
एसटी महामंडळं सरकारमध्ये विलिनीकरणं चुकीचं आहे असं भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले. हे तात्काळ शक्य नाही. भाजपमधील काही हवशे, नवशे, गवशे हे यावर नाचत आहेत. त्यांच्या नाचण्यानं कामगारांचे प्रश्न सुटतील तर सुटतील, असं शिवसेना खासदार राऊत म्हणाले.

कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. एसटी कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये. कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!