Wednesday, December 8, 2021

गायीचे शेण व दूध विकण्यासाठी सिव्हिल इंजिनियरने सोडली कॉर्पोरेट नोकरी; दरमहा कमावतोय 10 लाख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात लोक पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. गायी-म्हैशीचे दूध आणि त्याचे उपपदार्थ विकून अनेक पैसे कमावत असतात. तर काहीजण

दुधासह शेणापासून बनवलेले सेंद्रिय खतही तसेच गोमूत्र विकून पैसे मिळवत असतात. पण आज आम्ही अशा एका अभियंता(इंजिनिअर) विषयी सांगणार आहोत जो आई-वडिलांसोबत एक डेअरी फार्म चालवत आहे.

तुम्ही म्हणाल यात काय विशेष, थांबा, खरी गंमत पुढे आहे. या 26 वर्षीय मुलाने कॉपोर्टेमधील नोकरी सोडून डेअरी चालू केली आहे. या डेअरीतून मिळणारं दूध, शेणखत, गो-मूत्र, याशिवाय हा इंजिनिअर

गायींना अंघोळ घातलेल्या पाण्यातूनही पैसा कमावत आहे. हो अगदी तेच गायींना अंघोळ घातल्यानंतर गोठ्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यातून इंजिनिअर पैसा कमावत आहे.
या मुलाचे नाव आहे, जयगुरू अचर हिंदर. हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर

तालुक्यातील मुंद्रू गावचा रहिवाशी आहे. जयगुरुने विवेकानंद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर एका खासगी कंपनीत जयगुरूने नोकरीही केली. एक वर्ष नोकरी केल्यानंतर जयगुरू

त्या ९ ते १० ची वेळ असलेल्या नोकऱीला कंटाळला. याच कारण होतं, त्याला नोकरीपेक्षा शेती आणि गायीं पालन करणं अधिक आवडत होतं. त्याला आपल्या वडिलांच्या शेतात आणि गायींसोबत वेळ घालवणे नेहमी आवडत असायचं. त्याने 2019 मध्ये एके दिवशी

महिन्याला ठोक रक्कम देणारी नोकरी सोडून वडिलांसोबत शेती आणि गायींचे पालन करण्याचे ठरवले. जयगुरू यांच्याकडे दहा गायी आहेत, त्यांनी या कामाला पारंपारिक पद्धतीने न करता यात नवीन तंत्रज्ञान वापरत लाखो रुपयांची कमाई सुरू केली.

“मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्याचा आणि उत्पन्न वाढवण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग वापरण्याचा विचार करत होतो. हे सर्व कल्पना नंतर व्यावहारिक निर्णयांमध्ये उपयुक्त ठरली,” अचर सांगतात. अचर पुढे सांगताना म्हणाले

की, डेअरी आता खूप चांगल्या प्रकारे विस्तारली गेली आहे आणि स्थापित झाली आहे. गुरांची संख्या 130 पर्यंत वाढली आहे आणि कुटुंबाकडे 10 एकर शेतीदेखील आहे जेथे सुपारी हे मुख्य पीक आहे. अचर यांनी

फार्म डेअरीमध्ये काही नवनवीन शोध आणले, ज्यामुळे कुटुंबाला महिन्याला 10 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!