Wednesday, December 8, 2021

पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाचा इशारा ;या 11 जिल्ह्यांना तडाखा बसणार..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. तर उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे.

गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. आज पहाटे पुणे जिल्ह्यातील हवेली याठिकाणी सर्वात कमी 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात पहाटे वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे.

दुसरीकडे, सध्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या

किनारपट्टी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. संबंधित परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा काहीअंशी परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे.

महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (13 नोव्हेंबर) आणि रविवारी (14 नोव्हेंबर) पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत.

या जिल्ह्यांत वेगवान वारे वाहणार असून या वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असणार आहे. रविवारी देखील राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून याच अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी

पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सुट्टीनिमित्त फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पुणेकरांनी लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!