Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग:त्याने मुलीकडे बघत अश्लील हावभाव करत तिचे फोटोही काढले अन्

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा केल्याच्या रागातून कुटुंबीयास मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तिगाव येथे घडली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील तिगाव गावात अल्पवयीन मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा करणाऱ्या कुटुंबीयास बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तालुक्यातील एका गावातील एका १४ वर्षीय अल्पवयीन शेतात काम करीत

असणाऱ्या आपल्या आईसाठी पाण्याची कळशी घेऊन जात होती. दरम्यान एका व्यक्तीने त्या मुलीकडे बघत अश्लील हावभाव केले तसेच तिचे फोटोही काढले. मुलीने हा प्रकार शेतात गेल्यावर आपल्या आईला सांगितला असता आईने मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा

आरोपीला केली मात्र त्याने काही एक उत्तर न देता संध्याकाळी फिर्यादी महिलेचा पती घरी आल्यानंतर महिलेने मुली संदर्भातील घटना पतीस सांगितली त्यामुळे पतीने याची विचारणा करण्याचा प्रयत्न सदर आरोपीकडे केला मात्र आरोपीने शिविगाळ करीत हातातील

गजाने फिर्यादी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. त्यांना सोडविण्यास गेलेल्या फिर्यादी महिलेस व मुलास मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले.याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भास्कर कारभारी गायकवाड

याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!