Wednesday, December 8, 2021

निलेश लंकेंचा इशारा तर विरोधकांना पाणी पाजू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांचे पानीपत केले असून आगामी बाजार समितीच्या निवडणुकीतही विरोधकांना पाणी पाजू असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी येथे व्यक्त केला.

जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने पारनेर तालुक्यातील सेवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा व सचिवांचा मेळावा पारनेर येथील गणेश मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी आ. लंके बोलत होते.

सहकार चळवळीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके व संचालक सभापती प्रशांत गायकवाड यांचे काम आदर्श असून सहकाराचा वारसा पुढे नेण्याचे काम हे दोघे करीत असल्याची कौतुकाची थाप आमदार लंके यांनी दिली.

आ. लंके यांनी या मेळाव्यात केलेले वक्तव्य हे पारनेर बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे चिन्ह असल्याचे बोलले जात आहे. सध्या बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असून अनेकवेळा तोडफोडीचे राजकारण होऊनही आ. लंके व सभापती

प्रशांत गायकवाड यांनी पाच वर्षे सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. यामुळे निवडणुकीत किती धुरळा उडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.यावेळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर संचालक सभापती प्रशांत गायकवाड अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे ,

बाजार संचालक शिवाजी बेलकर, संचालक सावकार बुचुडे ,लहु थोरात, अण्णा बढे, प्रदिप सोमवंशी, बाबाजी भंडारी, बी.एन.भालेकर, विक्रम कळमकर, किसनराव रासकर, जिल्हा बँकेचे टीडिओ इंद्रभान शेळके, सहायक निबंधक गणेश औटी, सोमनाथ वरखडे, सचिव संघटनेचे नेते दत्ता पतके,

बापुसाहेब चंदन, रा.या.औटी, बबलु रोहकले, प्रदिप सोमवंशी खंडू भाईक, राजेंद्र शिंदे ,सरपंच राहुल झावरे, सखाराम औटी ,भागुजी झावरे, जालिंदर वाबळे, भागाजी गावडे, अशोक ढवळे, कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर लाळगे, अमोल रेपाळे, राजू पठारे, गोकुळ लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!