Friday, December 3, 2021

खा विखे म्हणाले यांच्या घरी छापा मारला तर गांजा सापडतो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे माधवराव निऱ्हाळी नाट्यगृह व लोकनेते गोपनाथ मुंडे जॉगिंग पार्क या विकासकामाचे लोकार्पण आज सायंकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना खा डॉ.सुजय विखे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते. मंत्री मलिक यांचा नामोल्लेख टाळत विखे यांनी टीका केली. डॉ. विखे म्हणाले, ‘स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री टीव्हीवर रान उठवत आहेत.

सध्या जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री टीव्हीवर येत आहेत, ते त्यांनी किती अल्पसंख्याकांना रोजगार दिला, अल्पसंख्याक बांधवासाठी कोणती योजना राबवली, यावर भाष्य करीत नाहीत. फटाका, बॉम्ब फोडण्याच्या घोषणा करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा बॉम्ब त्यांनी फोडावा.

या मंत्र्याला शेतीतील उत्पन्नाबाबत काही माहिती नाही, पण गांजा किती रुपयांना मिळतो, हे माहिती आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी छापा मारला तर कांदा, सोयाबिन, तूर सापडेल. मात्र, यांच्या घरी छापा मारला तर गांजा सापडतो’, अशी टीका विखे यांनी केली.

महाराष्ट्रातील सात-आठ लोकांना टीव्हीवर येण्यासाठी बंदी केली पाहिजे. कारण या लोकांना पाहून घरामध्ये भांडणे होत आहेत. आता मीच यासाठी न्यायालयात याचिका करण्याच्या विचारात आहे, असे सुजय विखे म्हणाले. डॉ. विखे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरही टीका केली.

ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत दर आठवड्याला नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एक तरी मंत्री येतो. ज्यांच्यावर महाराष्ट्र व देशाची जबाबदारी आहे, तेही नगरला एका महिन्यात तिसऱ्यांदा आले. हे नेते नगर जिल्ह्यात आले, पण ते त्या कामाची उद्घाटने करण्यासाठी आले, ज्यामध्ये

त्यांचे एक रुपयाचे सुद्धा योगदान नाही. महाविकास आघाडी सरकारने मागच्या वर्षभरात केलेली सर्व भूमीपूजनं ही मागील भाजप सरकार काळात झालेली आहेत. पण जे स्वतः केले नाही, त्याचे श्रेय हे लोक घेत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!