Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग:त्याने पोलीस ठाण्यात घेतले विष;फेसबुकवर पोस्ट टाकून केले गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील अनिल प्रभाकर उदावंत (वय 42) याने मंगळवारी लोणी पोलीस ठाण्यात विष प्राशन करून जाताना फेसबुकवर अखेरची पोस्ट टाकत माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल

केल्याने मी हे करीत असून माझ्या मृत्यूला शेतकरी आत्महत्या समजू नये असा मजकूर टाकल्याने लोणी परिसरात एकच खळबळ उडाली. या पोस्टची सत्यता पोलिसांना तपासावी लागणार आहे. दरम्यान बुधवारी रात्री अनिलचा मात्र मृत्यू झाला.

सुत्रांच्या माहितीनुसार अनिल उदावंत आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याने पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेले आहेत. बुधवार दि. 10 रोजी रात्री अनिलचा प्रवरा रुग्णालयात

मृत्यू झाला. अनिल मंगळवारी सकाळी लोणी पोलीस ठाण्यात आला होता. अधिक माहिती देताना लोणी पोलिसांनी सांगितले की, त्याच्या हातात विषाची बाटली होती. तो विष पिऊन आलेला होता. परिस्थितीचे गांभीर्य बघून पोलिसांनी त्याला प्रवरा

रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. परंतु त्याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.मात्र लोणीत समाज माध्यमावर अनिल उदावंत यांनी विष प्राशन करण्यापूर्वी फेसबुकवर

टाकलेली एक पोस्ट फिरत आहे. मंगळवारी पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी अनिलने ही पोस्ट टाकल्याचे बोलले जाते. त्यात त्याने माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे देणारे व दाखल करणारे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. माझी आत्महत्या शेतकरी आत्महत्या समजू नये अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!