भेंडा लोस सेवा: राम कथा सर्वांच्या जीवनात एक आनंद निर्माण करणारी कथा आहे संतांच्या संगती शिवाय विवेक घडू शकत नाही असे प्रतिपादन नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीराम कथेचे दुसरे पुष्प गुंफताना नंदकिशोर महाराज नेवासेकर बोलत होत .
नंदकिशोर महाराज पुढे म्हणाले की, खरे बोलणारा मनुष्य नेहमी प्रसन्न असते.आपल्या मनासारखे घडत असले तर ती भगवंताची कृपा आहे. लेकीच्या जन्माचे स्वागत करा. ज्या घरात मुलीचा जन्म होतो त्या ठिकाणी भगवंत येत असतात. आपल्या
प्रारब्धात मध्ये जे आहे ते घडणारच आहे .जीवन जगत असताना प्रामाणिकपणे कर्म केले तर आपल्याला तो आशीर्वाद निश्चित मिळतो.जीवनात मनुष्य तप करा,तपाचे फळ निश्चित मिळत. मनुष्याच्या जीवनात काही गोष्टीचा भगवंताच्या इच्छेने
आपल्याला स्वीकार करावा लागतो. एखाद्या विषयाचे जास्त चिंतन केले तर ते घातक असते . दक्षिणमुखी मारुतीराय हे भगवान शिवाचे अवतार आहे. दररोज घरात घंटी, शंखाचा आवाज झाला पाहिजे, येणाऱ्या अडचणी व्याधी दूर होतात. गीता ,भागवत तसेच ग्रंथ आपल्या
जीवनाचा उद्धार करणारे आहेत .संसार कसा करावा हे राम चरित्र मानस मधून शिकावे. भगवंताची नामस्मरण हे प्रत्येक घराघरात झाले पाहिजे असे नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी सांगितले.
राम कथेच्या दुसऱ्या पुष्पाला भेंडा आणि परिसरातील सौंदाळा , भेंडा खु,रांजणगाव, देवगाव गेवराई, कुकाना या गावातील नागरिकांनी कथा ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती .दुसऱ्याच दिवशी गर्दीचा उच्चांक हा मोठा होता येणाऱ्या पुढील दिवसातही गर्दी वाढेल असा अंदाज श्रीराम सेवा मंडळाच्या सदस्यांनी केला आहे.