Tuesday, November 30, 2021

ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाट; भारतावरही सावट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:साधारण गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, अनेकांनी जीवदेखील गमावले आहेत. चीनमधून सुरू झालेला

कोरोनाचा कहर संपूर्ण जगभर पसरला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना जगातल्या मोठमोठ्या देशांचेदेखील प्रचंड हाल झाले होते. दरम्यानच्या काळात संशोधकांना कोरोनाची लस तयार करण्यात यश आलं. सध्या

जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. त्यामुळं कोरोनाची तीव्रता काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे.
भारतामध्येदेखील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे. प्रसाराची तीव्रता कमी झाली असली, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

मात्र लस घेतल्यानंतर नागरिकांचा निष्काळजीपणा वाढताना दिसत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असून, सुरक्षिततेच्या कुठल्याही नियमांचं ते पालन करत नाहीत, असं दिसत आहे. भारतामध्ये तिसरी लाट येणारच नाही, अशा

आविर्भावामध्ये नागरिक बिनधास्त वावरत आहेत. ही गोष्ट जीवघेणी ठरू शकते, हे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो, याची प्रचिती सध्या ब्रिटन आणि फ्रान्स हे देश घेत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या आणि फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने

दहशत निर्माण केली आहे.देशात पाचवी लाट भयंकर रूप धारण करण्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे. येऊ घातलेला हिवाळा पाहता परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे,’ असं मत फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरेन यांनी व्यक्त केलं आहे.

भविष्यातला धोका लक्षात घेऊन फ्रान्स सरकारने 65 वर्षांवरच्या वृद्धांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी बूस्टर डोसचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केलं आहे. दुसरीकडे ब्रिटिश शास्त्रज्ञांनीदेखील बोरिस जॉन्सन सरकारला शेजारी देशांप्रमाणं वेळीच कठोर निर्बंध लादण्याची विनंती केली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!