Saturday, November 27, 2021

ते नगरला एका महिन्यात तिसऱ्यांदा आले उद्घाटने करण्यासाठी ज्यामध्ये त्यांचे एक रुपयाचे सुद्धा योगदान नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर पाथर्डी येथे माधवराव निऱ्हाळी नाट्यगृह व लोकनेते गोपनाथ मुंडे जॉगिंग पार्क या विकासकामाचे लोकार्पण आज सायंकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. विखे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते. खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, ‘स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री टीव्हीवर रान उठवत आहेत. सध्या जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री टीव्हीवर येत आहेत

ते त्यांनी किती अल्पसंख्याकांना रोजगार दिला, अल्पसंख्याक बांधवासाठी कोणती योजना राबवली, यावर भाष्य करीत नाहीत. फटाका, बॉम्ब फोडण्याच्या घोषणा करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा बॉम्ब त्यांनी फोडावा.

महाराष्ट्रातील सात-आठ लोकांना टीव्हीवर येण्यासाठी बंदी केली पाहिजे. कारण या लोकांना पाहून घरामध्ये भांडणे होत आहेत. आता मीच यासाठी न्यायालयात याचिका करण्याच्या विचारात आहे, असे सुजय विखे म्हणाले. डॉ. विखे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे

अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत दर आठवड्याला नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एक तरी मंत्री येतो. ज्यांच्यावर महाराष्ट्र व देशाची जबाबदारी आहे, तेही नगरला एका महिन्यात तिसऱ्यांदा आले.

हे नेते नगर जिल्ह्यात आले, पण ते त्या कामाची उद्घाटने करण्यासाठी आले, ज्यामध्ये त्यांचे एक रुपयाचे सुद्धा योगदान नाही. महाविकास आघाडी सरकारने मागच्या वर्षभरात केलेली सर्व भूमीपूजनं ही मागील भाजप सरकार काळात झालेली आहेत. पण जे स्वतः केले नाही, त्याचे श्रेय हे लोक घेत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!