Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील हा खेळाडू पाहिल्या कसोटीसाठी कर्णधार;न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी सामन्याच्या आणि टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. बीसीसीआयनं न्यूझीलंड

विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे विराट कोहलीच्या अनुपस्थित कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दोन्ही टीममधील कसोटी

मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये तर दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. बीसीसीआयनं कॅप्टन विराट कोहलीला पहिल्या कसोटीसाठी तर रोहित शर्माला संपूर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने तब्बल पाच वर्षांनंतर जयंत यादवला संघात संधी दिली आहे.

जयंतने शेवटची मालिका 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. याशिवाय दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यर आणि आयपीएलमधील प्रसिद्ध गोलंदाज कृष्णा यांना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.

टी-20 मालिकेसाठी संघ यापूर्वीच जाहीर

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा मंगळवारी केली होती. टी-ट्वेन्टीच्या टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आलीय. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!