Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात पुन्हा राजकीय चर्चेला उधाण : शिवसेनेच्या या नेत्याने खा.विखेंना जिलेबी भरवली…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना आमदारकीसाठी शुभेच्छा देणार्‍या खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना कर्डिलेंनी दिवाळी फराळ कार्यक्रमात स्वत:च्या हाताने गोड जिलेबी खाउ घातली होती. या फोटोची चांगलीच चर्चा झाली.

त्यानंतर आता शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनीही खा.विखेंना स्वत:च्या हाताने जिलेबी भरवल्याचा फोटो समोर आला आहे. स्वत: खा.विखेंनीच आपल्या समाजमाध्यम अकाउंटवर हा फोटो अपलोड केला आहे. प्रा.गाडे यांनी

आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला खा.विखेंनी आवर्जून हजेरी लावत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी विखेंना मिठाई भरवा असा आग्रह केला. त्यावेळी उडालेल्या हास्यकल्लोळातच गाडे यांनी विखेंना जिलेबीचा घास भरवला.

यावेळी संपतराव म्हस्के, शरदनाना झोडगे, संदेश कारले, बाळासाहेब हराळ, सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.दरम्यान दुसरीकडे शिवाजी कर्डिले दर वर्षी दिवाळी फराळाचा कार्यक्रम घेतात. मात्र यंदाच्या फराळ कार्यक्रमाला विधानपरिषद

निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी आहे. कर्डिलेनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना दिवाळी निमित्त मिठाई पाठविली. तसेच फराळाच्या कार्यक्रमालाही आमंत्रण दिले होते. त्यानुसार आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. सुजय विखे पाटील बुऱ्हाणनगरला आले होते.

या प्रसंगी फराळाच्या पंगतील खासदार विखे पाटील बसले होते. त्यांना कर्डिले यांनी फराळाचा घासही भरवत तोंड गोड केले. विधानपरिषद निवडणुकीत नगरपालिका व जिल्हा परिषद सदस्य मतदारांची संख्या जास्त आहे. यात विखे यांच्या समर्थकांची संख्या लक्षणिय आहे. त्यामुळे या निवडणुकीत विखे

यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ही बाब लक्ष्यात घेता कर्डिलेंचा आजचा राजकीय फराळ कर्डिलेंना निवडणूक विजयाचा गोडवा देणार का हे लवकरच कळणार आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!