Saturday, November 27, 2021

निम्न पैनगंगा धरणापर्यंत 44.54 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी-ना.जयंत पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई दि. 12

निम्न पैनगंगा धरणापर्यंत 44.54 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. हा निर्णय मराठवाड्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत 117.87 टीएमसी पाणी आहे, असे गृहित धरून आंध्र प्रदेश शासनासोबत चर्चा केली जात होती.
अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत  समस्या मांडल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत 117.87 ऐवजी 167.46 टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले.
या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूस, अरूणावती व उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे 44.54 टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयाने हिंगोली, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात जलसंपदा विभागामार्फत केल्या जातील, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

 

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!