Saturday, November 27, 2021

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणजे राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान  खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात १४ नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस मेघ गर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुण्यात यलो अर्लट जारी केला आहे. याच तीन दिवसात दक्षिण कोकण,

दक्षिण मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर

वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याने उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या दहा जिल्ह्यांना येलो

अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान, गतिमान वारे वाहणार असून याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे.राज्यात पावसाचे वातावरण निर्माण होत

असतानाच दुसरीकडे पुण्यासह राज्यातील इतर भागातही थंडीचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!