Friday, December 3, 2021

उद्या नगर जिल्ह्यातील या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारसह पाच मंत्र्यांची उपस्थित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत. त्यांचे भूमिपूजन शनिवारी (१३ नोव्हेंबर) रोजी होणार आहे.

यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.एकाचवेळी तब्बल २३० कोटींच्या कामाचे भूमिपूजन तेही पाच बड्या मंत्र्यांच्या हस्ते ठेवल्याने एक प्रकारे हे शक्तिप्रदर्शनच मानले जात आहे. या सर्व विकासकामांचा

भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बाजारतळ जामखेड आणि दुपारी दोन वाजता बाजारतळ, कर्जत येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे, राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार, राज्यमंत्री दत्तमामा भरणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

जामखेड शहराची पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, व्यापारी संकूल, विश्रामगृह, बसस्थानक व व्यापारी संकूल, नाना-नानी पार्क, वाचनालय, तलाठी कार्यालय, पोलिस अधिकारी-कर्मचारी वसाहत, पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी निवासस्थान, अमरधाम अशी विविध प्रकारची कामांचा यामध्ये समावेश आहे.

यासंबंधी आमदार पवार म्हणाले, ‘कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलेलो आहे. या भागातील मागील कित्येक वर्षांचा कासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी सरकार आणि मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे. कर्जत-जामखेडमधील गटा-तटाचे,

जातीपातीचे राजकारण मोडून काढून विकास कामे करण्यावर आपला भर राहील. कोट्यावधींच्या योजनांना मंजुरी मिळवून मतदारसंघाच्या सातत्यपूर्ण विकासासाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला आहे. यानिमित्त संबंधित मंत्र्यांचे

आभार व्यक्त करण्यासाठी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!