Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात या ठिकाणी तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नानज दुमाला येथे विहिरीतील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करणयात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सागर भास्कर कोळपे वय २२ असे विहिरीतील

पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर हा गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शेतात कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता.

शेतातील विहीरीवर विद्युत मोटार चालू करण्यसाठी गेला असता त्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी पाण्याचा उपसा करून काढण्यात आला. तब्बल सहा तासानंतर हा मृतदेह

बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेने नानज दुमाला गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!