Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकींग: याठिकाणी आढळला तरुणाचा मृतदेह ;घातपात की अपघात उलटसुलट चर्चा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका 20 ते 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह काल सकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील स्लीपरोडवर आढळून आला आहे.

या तरुणाच्या चेहर्‍यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने त्याचा घातपात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.घुलेवाडी शिवारात गट सर्वे नंबर 37 मधील सुनिल धोंडीबा राऊत यांच्या शेताच्या पश्चिमेस नाशिक-पुणे

महामार्गावरील स्लीप रोडवर काल सकाळी एका 20 ते 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर तरुणाच्या अंगात काळेपांढरे चौकटीचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, पायात सॅन्डल घातलेला तसेच छातीवर व डोक्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा दिसून आल्या. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या खबरीवरुन पोलिसांनी

अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 113/2021 सीआरपीसी 134 प्रमाणे नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!