Friday, December 3, 2021

सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट:नगर जिल्ह्यातील आमचाच एक नेता राष्ट्रवादी जाणार होता पण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा खासदार सुजय विखे पाटील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते.

त्यांनी मंत्री नवाब मलिक, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना टोले लगावत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.दरम्यान विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची नगरची निवडणूक मतदार संख्येच्या कारणामुळे तूर्तास टळली आहे.

निवडणूक आयोगाने नगर व सोलापूर वगळता इतर मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी नगरमधून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जोरदार तयारी चालवली आहे. याबाबत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी

या कार्यक्रमात सूचक भाष्य केले आहे. विखे पाटील म्हणाले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक आली म्हणून काही नगरसेवकांनी टीव्ही, गाड्या बुक केल्या, पण ते निराश झाले. मात्र, घाबरू नका. पुढच्या वेळेस मी दोन्ही बाजूंच्या

उमेदवारांकडे तुमचे सेटिंग लावीन. या निवडणुकीत आमचाच माणूस तिकडे जाणार होता, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळून केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या.

तसेच निर्लज्जपणे महाविकास आघाडीचे काम सुरू आहे. हा सर्व तमाशा केवळ दोन वर्षातील नाकर्तेपणाला झाकण्यासाठी सुरू आहे, अशी टीका खा. विखे पाटील यांनी केली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!