Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार ;आधार कार्ड प्रमाणीकरण करण्यासाठी ही शेवटची मुदत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यात नगर जिल्ह्याचा राज्यात पहिला नंबर आहे. असे असले तरीही जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी

त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड प्रमाणीकरण केलेले नाही. त्यांच्यासाठी १५ नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली असून त्या काळात हे काम झाले नाही, तर हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेच्या अंमलबजावणीत नगर जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८६ हजार ८६१ शेतकर्‍यांना १ हजार ७४२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे.

राज्यात कर्जमाफी मिळालेल्या शेतकरी संख्येमध्ये आणि कर्जमाफीच्या रकमेमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्याचे काम राज्यामध्ये आघाडीवर आहे. मात्र, या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात काही पात्र शेतकरी वंचित राहिले होते

अशा ५ हजार ३०० शेतकर्‍यांची यादी राज्य शासनाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. नव्याने यादीत आलेले हे शेतकरी तसेच पूर्वीच्या यादीत शिल्लक राहिलेले ४ हजार ६७८ असे मिळून ९ हजार ९७८ शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे.

येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही तर संबंधित शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार आहेत.महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतरशेतकर्‍यांना २ लाखापर्यंतची कर्जमाफी पहिल्या टप्प्यात दिली आहे.

याचवेळीनियमितपणे कृषी कर्ज फेडणारांना ५० हजार तसेच दोन लाखावर कर्ज असलेल्यांनाहीदोन लाखावरील थकबाकीपैकी काहीअंशी माफी देण्याचे घोषीत केले होते. पण नंतर मार्च २०२० पासून करोनाचा प्रकोप झाल्याने या दोन्ही

नव्या माफीच्या योजना अजूनपर्यंत प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांमधून या योजनांच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!