Tuesday, November 30, 2021

अण्णा हजारेंचे मोठे विधान म्हणाले, सरकार पडू शकतं असं वाटल्याशिवाय…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत कर्मचारी आणि नागरिकांनाही सरकारवर दबाव वाढविण्याचा सल्ला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्ट मंडळाने

राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देत, त्यावर चर्चा केली. ती ऐकून घेतल्यानंतर हजारे म्हणाले, सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या

करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी लाखो नागरिकांनी एकाचवेळी बाहेर पडले पाहिजे. दबाव आल्याशिवाय आणि सरकार पडू शकते, असे वाटल्याशिवाय कोणतेही सरकार हालत नाही.

मात्र, कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची यामध्ये हानी होता कामा नये, असेही हजारे यांनी कर्मचाऱ्यांना बजावले.

कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच संघटना यामध्ये सहभागी झाल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील विरोध पक्ष भारतीय जनता पक्षाने संपाला पाठिंबा देत त्यामध्ये सहभागही घेतला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी

कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. आपल्या संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेतली. त्यांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर हजारे यांनी मागण्यांशी सहमती दर्शवत आंदोलनासंबंधी सल्ला दिला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!