Friday, December 3, 2021

अजित पवारांनी घेतला राम शिंदेचा समाचार;म्हणाले गप बसून ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र. न्यूज :आता विकासकामे झाल्यावर मागचे आमदार म्हणतील आमच्याच काळात मंजूर झाली. हे चुकीचे आहे. तुम्ही दहा वर्षे आमदार होता त्यावेळी केलेली कामे आम्ही नाकारणार नाही. आता रोहित पवार करीत असलेल्या कामांचे श्रेय लाटू नका.

लोकांनी तुम्हाला थांबवलय गप बसून आपलं कुठं चुकले याचे आत्मपरीक्षण करा, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांना लगावला आहे.जामखेडमध्ये आयोजित विविध विकास कामांच्या भूमीपूजन

सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आ.रोहित पवार, आ.संग्राम जगताप, आ.निलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, कर्जत जामखेड परिसराला वेगळी परंपरा आहे. या मतदारसंघात जे जे आमदार झाले त्यांनी आपापल्या परीने प्रयत्नांची शिकस्त केली. पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. हा परिसर टेलला असल्याने काय अडचण असते हे आम्हाला माहिती आहे.

अशावेळी रोहित पवारच्या रुपाने एक तरूण लोकप्रतिनिधी आला. त्यावेळी मी स्वत: तसेच शरद पवार साहेबांनी जनतेला आवाहन केलं. आम्ही जे बोलतो तसच वागतो. आज कोट्यवधींची विकासकामे या मतदारसंघात झाली आहेत. महाविकास आघाडी सरकार

मोठ्या प्रमाणात निधी देत आहे. निवडणुकीवेळी काही लोकांनी मतदान डोळ्यासमोर ठेवून जामखेड शहराच्या पाणी योजनेबाबत घोषणा केल्या. पण त्या प्रत्यक्ष आणण्याचे काम आमच्या सरकारने केलं. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी कागद दाखवून तत्वत: मंजुरीची घोषणा केली.

पण तत्वत: म्हणजे फक्त लोकांची दिशाभूल असते. आम्ही तसं करीत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. त्यांच्या योजनेतून 50 टक्के जामखेड शहर वंचित राहणार होतं. या त्रुटी आम्ही दूर केल्या.

या मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी नितीन गडकरींनी निश्चितच मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभारच मानतो असे ही पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!